मुंबई : आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.
'पेसर' हे अॅप आरोग्याबाबत माहिती देणार आहे. या अॅपमध्ये वय, उंची आणि वजनानुसार दिवसभरात किती पायी चालले पाहिजे यांची माहिती मिळते.
या अॅपने आपल्याला दिलेल्या माहितीनुसार तसे केल्यास आपले आरोग्य ठिकठाक ठेवण्यास मदत होते. 'पेसर'च्या सल्ल्यानुसार तुम्ही पायी चालल्यास ठराविक कालावधीत किती वजन कमी होऊ शकते, याचा अंदाज मिळतो. त्यामुळे आपण आपले आरोग्य योग्य ठेवण्यास मदत मिळते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.