मुंबई : वाढत्या वयाबरोबर त्वचा रोग वाढण्याची शक्यता अधिक असते, मात्र आधीपासून निरोगी त्वचा असल्यासं त्वचेचे आजार लांबच राहतात.
त्वचा ही मानवी शरीराचा आरसा असतो असे समजले जाते. बऱ्याचदा त्वचेवरून व्यक्तीचा वयाचा अंदाजही लावला जातो. निरोगी आरोग्याचे प्रतिक म्हणजे तकाकीयुक्त, नितळ, मुलायम त्वचा असते.
मानवी शरीराचे संरक्षण त्वचेमार्फत होते. ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम हा त्वचेवर होतो. तारुण्यात येणाऱ्या तारूण्यपिटीका आणि म्हातारपणात त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या तसेच राग आल्यावर लाल रंग धारण करणारी त्वचा ही अत्यंत महत्वाची आहे.
त्वचा संसर्गाची काही कारणं
१) फास्ट फूडचे सतत सेवन करणे.
२) त्वचेचा अस्वच्छता ठेवणे.
३) सतत धूळ व प्रदूषणाच्या ठिकाणी थांबणे.
४) त्वचेच्या आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणे.
५) घाम आल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर त्वचा व्यवस्थित कोरडी न करणे. त्वचा कोरडी न केल्यामुळे कोंड्याची निर्मिती होते.
६) केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर मोठ्याप्रमाणात वापर करणे. इत्यादी कारणांनी त्वचेचा संसर्ग होतो.
त्वचेला संसर्ग झाल्याची काही लक्षणे
१) त्वचेला खाज निर्माण होते व कोंड्याची निर्मिती होते.
२) त्वचेवर पुरळ, पिटीका येतात.
३) त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला दाह होतो.
४) त्वचेचा रंग बदलतो.
५) त्वचा लालसर होते. त्वचेचे मूळ स्वरूप बदलते.
६) त्वचेला दुर्गंध येणे. इ. लक्षणाची निर्मिती त्वचेच्या स्वच्छतेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होते.
त्वचेच्या संसर्गावर काही घरगुती उपाय
१) आंघोळ केल्यानंतर अथवा घाम आल्यावर ओली त्वचा व्यवस्थित रित्या कोरडी करणे तसेच खूप घाम येणाऱ्या ठिकाणी पावडरचा वापर करणे.
२) त्वचेवरती केमिकलयुक्त क्रिमचा, साबणाचा कमी प्रमाणात वापर करणे.
३) चांगल्या त्वचेचे आरोग्य दीर्घायुष्य टिकण्यासाठी आहारातून स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. उदा.गाईचे तूप, बदाम, खजूर इ. सारख सुका मेवान यांचा आहारात समावेश असावा.
४) त्वचेच्या काळजीसाठी चांगले मॉयश्चरायझर विशेषतः कोरड्या त्वचेसाठी दुधावरची साय किंवा बदाम वगळून लावावे.
५) त्वचेतील ओलावा टिकविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच ऑलिव्ह ऑइलचा/ तेलाचा वापर करावा.
६) त्वचेला उजळ रंग प्राप्त व्हावा म्हणून त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा.
७) ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये बँड नावाचा त्वचेवर विकार मोठया प्रमाणात होताना आढळतो. बँड म्हणजे मोठया आकारातील पुरळ असतात. ज्याचे मुख्य कारण हे त्वचेची अस्वच्छता हेच आहे.
८) केमिकलयुक्त साबणाचा वापर करण्याशिवाय नैसर्गिक घटकांचा वापरणे युक्त असे आयुर्वेदिक उटणे वापरावे.
त्वचा निरोगी राहिली, तर संपूर्ण शरीराचे संरक्षण होते आणि आरोग्य सुदृढ राहण्यास मदत हा महत्वाचा मुद्दा आहे.
घरी तयार करता येण्यासारख्या आयुर्वेदिक उटण्यासाठी लागणारे घटक
डाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर + अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास नक्की मदत होत राहते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.