स्मार्टफोनने उडते रात्रीची झोप

तुम्हांला माहित आहे का? मोबाईल फोनमधून येणाऱ्या निळ्या उजेडामुळे रात्री तुम्हांला पहाटे झाल्याचा भास होतो, त्यामुळे आपण उठून खिडकी उघडून बाहेर पाहावे लागते. तज्ज्ञांनी इशारा दिला की, रात्री झोपण्यापूर्वी आपला स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे. याच्या उजेडामुळे झोपेचा खोळंबा होतो आणि व्यक्तीची पूर्ण झोप घेऊ शकत नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 28, 2014, 09:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
तुम्हांला माहित आहे का? मोबाईल फोनमधून येणाऱ्या निळ्या उजेडामुळे रात्री तुम्हांला पहाटे झाल्याचा भास होतो, त्यामुळे आपण उठून खिडकी उघडून बाहेर पाहावे लागते. तज्ज्ञांनी इशारा दिला की, रात्री झोपण्यापूर्वी आपला स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे. याच्या उजेडामुळे झोपेचा खोळंबा होतो आणि व्यक्तीची पूर्ण झोप घेऊ शकत नाही.
अमेरिकन केमिकल सोसायटीचे ब्रायन जोल्तोव्स्की यांनी सांगितले, की पहाट होणे, हे समजणे हा आपल्या जीवनात सर्वात चांगला जैविक संकेत आहे रात संपल्यानंतर आपल्याला निळा उजेड दिसायला लागते त्यावेळी आपल्याला समजते की सकाळ होणार आहे.
तसेच सायंकाळ होताना निळ्या रंगाच्या उजेडाच्या ऐवजी आपल्या लाल रंगाचा उजेड दिसतो. त्यामुळे आपल्याला रात्र सरण्याचा आभास होते. आपला मेंदू झोपण्याची तयारी करतो. सायंकाळच्या लाल उजेडाचा संपर्क जेव्हा डोळ्यात अत्यंत खोल असलेल्या कोषिकांतील प्रोटीन मेलानोप्सीन झाल्याने माणूस झोपी जातो.
उजेड जेव्हा या प्रोटीनच्या संपर्कात येतो तेव्हा कोषिका मेंदूत मास्टर क्लॉक तयार करते आणि संदेश प्रसारीत करतात. त्यामुळे कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे निश्चित होते. स्मार्ट फोनमुळे निळा उजेड पडतो त्यामुळे मेंदूला संदेश जातो की, पहाट झाली आहे. त्यामुळे गाठ झोप असताना अडथळा निर्माण होते आणि तुम्हांला जाग येते.
रात्री झोपण्यापूर्वी आपला स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे किंवा तुमच्यापासून दूर ठेवला पाहीजे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.