www.24taas.com,नवी दिल्ली
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मधाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
मध शरीरासाठी खूप उपयोगी ठरते. सर्व हंगामात मध घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्याला सर्दी झाली असेल तर मध घेतल्याने खास उपयोग होतो आणि सर्दी कमी होण्यास मदत होते.
मध दररोज घेतल्याने आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळते शिवाय आपला उत्साह कायम टिकून राहतो. शक्ती टिकविण्याचे काम मध करीत असते. मध प्राशन केल्याने आपले शरीर सुंदर, डौलदार होते. तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मध मदत करते. मात्र, ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढविण्यास मध उपयोगी ठरते. त्यामुळे वजन कमी करणे आणि वाढविणे असे दोन्ही उपयोग आहेत. गोड मध घेतल्याने आपल्या शरीरातील रोगांवर मात करता येते.
मध घेतल्याने आपल्या नजर चांगली होती. अस्थमा आणि उच्च रक्तदाबसाठी मध गुणकारी आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी मध उपयोगी ठरते. हृदयरोग्यासाठी मत अतिशय चांगली आहे.
गाजराच्या जुसबरोबर मध घेतल्याने कमजोर नजर चांगली होते. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी जेवण्याच्या आधी किमान एक तास आधी घेण्याची गरज आहे. मोतीबिंद कमी करण्यासाठी मध एकदम चांगले औषध आहे. मध औषधी असल्याने अनेक रोगांवर गुणकारी आहे. त्यामुळे रोगांपासून सुट्टी मिळण्यासाठी मध किती उपयोगी आहे, हे लक्षात येते.
कप कमी करण्यासाठी मध टॉमेटो किंवा संत्र्याच्या रसातून घेतल्याने आराम पडतो. दररोज एक चमच्या मध टॉमेटो आणि संत्रांच्या रसातून घेतल्याने कप कमी होतो. पाण्याबरोबर मध घेतल्याने तोंडात येणाऱ्या फोडी (तोंड येणे) कमी होतात. तसेच दातामधील बेदनाही कमी होण्यास मदत होते. दुधा आणि हळद यांच्या मिश्रणातून मध दररोज घेतल्याने आपल्याला स्फूर्ती मिळते.