'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा

पती-पत्नी यांच्यात केवळ शारिरीक संबंध असून चालत नाही तर मानसिकरित्याही ते तितकेच एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत.

Updated: Jun 23, 2016, 12:53 PM IST
'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा title=

मुंबई : पती-पत्नी यांच्यात केवळ शारिरीक संबंध असून चालत नाही तर मानसिकरित्याही ते तितकेच एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत. लग्नानंतर आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचे एकमेकांचे प्रयत्न सुरु असतात. मात्र अनेकदा जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत एकातांत असता तेव्हा काही गोष्टींवर विशेष करुन ध्यान देणे आवश्यक असते. शारीरिक संबंध ठेवण्याआधी पती-पत्नीने या गोष्टींचे जरुर कराव्यात ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.

१. शारिरीक संबंध ठेवण्याआधी जोडीदारासोबत लाडिवाळपणे वागा. 
२. जोडीदाराशी नेहमी चांगला संवाद साधा. इतरांच्या तुलनेत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे नाते अधिक घट्ट होते.
३. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. हास्यविनोद करा. 
४. केवळ शारिरीक संबंधांची गरज आहे म्हणून नको तर मानसिकरित्या एकत्र कसे येता येईल याचा जोडप्यांनी विचार करायला हवा.