विमानातले कर्मचारी कधीच का पित नाहीत 'चहा-कॉफी'

विमानातला बहुतांश स्टाफ कधीच विमानतील चहा किंवा कॉफी पित नाहीत. तुम्हाला असं वाटेल की, विमानातील चहा-कॉफी पिण्यास त्यांना परवानगी नसेल, पण याचं कारण काही वेगळंच आहे.

Updated: Feb 3, 2016, 02:49 PM IST
विमानातले कर्मचारी कधीच का पित नाहीत 'चहा-कॉफी' title=

मुंबई : विमानातला बहुतांश स्टाफ कधीच विमानतील चहा किंवा कॉफी पित नाहीत. तुम्हाला असं वाटेल की, विमानातील चहा-कॉफी पिण्यास त्यांना परवानगी नसेल, पण याचं कारण काही वेगळंच आहे.

विमानात मिळणारी चहा, कॉफी, फ्लाईटच्या पाण्यानेच तयार केली जाते.  या पाण्यात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. एका रिपोर्टनुसार एअरलाइनच्या वॉटर टँकमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असतो. हे पाणी चहा-कॉफीपासून बाथरूमसाठीही वापरलं जातं. 

अनेक वेळा पाण्याच्या चाचणीनंतर समोर आलं की, विमानाच्या पाण्याच्या टाकीत Pasteurella pneumotropica and Pseudomonas नावाचा बॅक्टेरिया असतो, याचं मोठ्या प्रमाणात संक्रमण होतं.

विमानात पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळतं, पण ते संपलं तर विमानातला क्रू तुम्हाला विमानातलंच पाणी देतो. मग सांगा आता घेणार की नाही काळजी.