असाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग...

असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.  

Updated: Jun 17, 2015, 04:40 PM IST
असाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग... title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.  

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणारे हे आहेत ७४ वर्षीय अशोक माचवे.. आज ते सहज चालताना फिरताना दिसतायत, इतकच नाही तर बिनदिक्कत गाडीही चालवू शकतात. एकटे नव्हे तर आपल्या पत्नीला परिसरातून फेरफटका ही मारून येतात.. मात्र एक काळ होता जेव्हा अशोक माचवे यांना आपल्या स्वताच्या पायावर चालण काय पण उभं ही राहता येत नव्हतं.. 

पाठ, कंबरदुखी आणि मणक्याच्या आजारांनी त्यांना बेजार केलं होत. या मणक्याच्या व्याधीतूनच वयाच्या ६२ व्या वर्षी स्लीप डिस्क सारखा आजार त्यांना जडला. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र माचवे यांना वयोमानानुसार शस्त्रक्रिया करायची नव्हती. त्यातच नाशिकमधील निसर्गोपचार केंद्रातील शिक्षकांशी त्यांचा संपर्क झाला आणि योग साधेनेन व्याधी दूर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अवघ्या चार पाच दिवसातच हळूहळू त्यांची पीडा कमी होऊ लागली. दिवसाला चार पाच पेनकिलर घेणारे अशोक माचवे आज एकही गोळी घेत नाही. हा चमत्कार योगासनांनी केलाय. गेल्या बारा वर्षांपासून अशोक माचवे न चुकता रोज सकळी एक तास योगासन करतात.. आंब्याचा व्यवसाय करणरे माचवे आता निवृत्तीच जीवन आनंदात जगतायेत... निरोगी आयुष्याच्या या गुरु किल्ली ने नवीन आयुष्य मिळण्याची भावना ते व्यक्त करतात. त्यांचा उत्साह बघून त्यांच्या घरच्यांनीही योगा सुरु केलाय.   

योगा आणि निसर्गोपचार पाठीचा मानेचा कुठलाही आजार, त्याच बरोबर मधुमेह रक्तदाब दूर करू शकतो. केवल अशोक माचवेच नाही तर त्यांच्या सारखे हजारो रुग्ण नियमित योगासन केल्याने स्वस्थ राहू शकतात असा दावा योगा प्रशिक्षक प्रवीण देशपांडे करतायेत..

विविध प्रकारच्या योगासनांनी केवळ शाररिक व्याधी दूर होतात असं नाही तर मानसिक स्वास्थःही तेवढच निरोगी राखलं जात असल्याने जीवनाचा खरा आनंद शोधायचा असेल तर दिवसातून किमान एक तास योगासानासाठी काढावा अस आवाहन योग प्रशिक्षक करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.