सेक्सनंतर कसं वाटतं महिलांना?

एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते. 

Updated: Oct 6, 2015, 06:04 PM IST
सेक्सनंतर कसं वाटतं महिलांना? title=

नवी दिल्ली : एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते. 

हे नुकतेच एका ऑनलाइन सर्वेमध्ये हे समोर आले आहे. या सर्वेमध्ये २३० महिलांचा समावेश करण्यात आला होता. ज्यात ४६ महिलांनी सांगितले की जीवनात एकदा तरी सेक्सनंतर उदास होण्याची भावना दिसून आली आहे. ५.१ टक्के महिलांनी सांगितले की गेल्या चार आठवड्यात पीसीडीचा अनुभब अनेकवेळा झाला आहे. 

दरम्यान, शोधकर्ता पीसीडी आणि इंटिमसी दरम्यान क्लोज रिलेशनशिपबाबत माहीत करू शकले नाही. डॉ़. रॉबर्ट सचवेटजर यांनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी यापूर्वी महिलांच्या सेक्स संदर्भात संशोधन केले आहे. नुकत्याच केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले की महिलांमध्ये नकारात्मक पोस्ट क्वाइटल इमोशनची वाढ झाली आहे. हा अभ्यास एका सेक्सुअल मेडिसीन जनरलमध्ये प्रकाशित झाला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.