या कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य

 तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही. 

Updated: Oct 5, 2015, 04:39 PM IST
या कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य  title=

लंडन :  तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही. 

दाम्पत्यांनी एकमेकांमधील संवाद वाढविला आणि एकमेकांच्या भावनांचा विचार केला तर त्याच्यातील यौन क्रिया काळानुसार वाढत जातात. जर्मनीच्या म्युनिखमधील लुडविग मॅक्समिलियन विद्यापीठात झालेल्या अध्ययनात लेखिका क्लाऊडिया स्किमिडबर्ग यांनी सांगितले की, आम्ही अभ्यासात पाहिले की संबंधाच्या पहिल्यावर्षी यौन संतुष्टीत वाढ झाली आहे. पण त्यानंतर कायम घट जाणवत आहे. 

यासाठी 25 ते 41 वर्ष वयोगटातील सुमारे तीन हजार जणांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार असे लक्षात आले की, मुलं झाल्याने यौन क्रियामध्ये घट होत नाही. हे अध्ययन आर्काइव्स ऑफ सेक्सुअल बिहेवियरमध्ये प्रकाशित झाले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.