नवी दिल्ली : अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.
मात्र दुसरीकडे एका सर्चमध्ये अरविंद केजरीवाल यांना अजूनही दिल्लीत सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना थोपवण्यासाठी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
किरण बेदी या दिल्लीच्या कृष्णानगरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शाह यांनी योवळी दिली. आज भाजपची निवडणूक समितीची बैठकीत पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
बेदी यांनी चार दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला होता. किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केत्याने आता दिल्लीत थेट किरण बेदी विरुध्द अरविंद केजरीवाल असा सामना पाहायला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.