नवी दिल्ली : आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये दोन महिला मंत्र्यांनी शपथ घेतलीय.
उत्तर प्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय. यो दोघीही महिला मंत्री उत्तर प्रदेशच्याच आहेत.
#CabinetExpansion: Anupriya Patel takes oath as the Minister of State in presence of President Pranab Mukherjee pic.twitter.com/pA6V4ot6l2
— ANI (@ANI_news) July 5, 2016
उत्तर प्रदेशातल्या खासदार अनुप्रिया पटेल 'अपना दल'च्या नेत्या आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनुप्रिया यांना मंत्री करणं भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. वाराणसीत त्यांच्या नुकत्याच झालेल्या सभेला भर पावसातही 15 ते 20 हजार लोकांची गर्दी होती. अनुप्रिया यांचं वक्तृत्व चांगलं आणि आश्वासक आहे. त्या कुर्मी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात.
#CabinetExpansion: Krishna Raj sworn in as the Minister of State at Rashtrapati Bhavan in Delhi pic.twitter.com/t3V4XRmbnI
— ANI (@ANI_news) July 5, 2016
तर कृष्णा राज यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्या उत्तर प्रदेशातल्या भाजपचा दलित चेहरा आहेत. आत्तापर्यंत लोकसभेच्या अधिवेशनात त्यांची 96 टक्के उपस्थिती आहे.