सुरत : गुजरातच्या सुरत शहरात एका २० वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
दिव्या बोरखतिया असं या मुलीचं नाव आहे. बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन तिनं आत्महत्या केलीय पण त्याहीपेक्षा धक्कादायक तिची सुसाईड नोट आहे.
माझ्या अंत्यसंस्कारांवर खर्च करू नका, त्यापेक्षा गोव्याला जाऊन एक-एक पेग मारा, असं तिनं तिच्या आई वडिलांना सुसाईड नोटमध्ये सांगितलंय. दिव्या ही अतिशय हुशार मुलगी होती. ती बीकॉमची दुस-या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती शिक्षणाबरोबरच पार्ट टाईम नोकरीही करत होती, घरी क्लासेसही घेत होती आणि ब्युटी पार्लरही चालवत होती.
ती जिथे नोकरी करत होती, तिथल्याच एका मुलाबरोबर तिचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ऑफिसमध्ये हे समजल्यावर दोघांनाही ऑफिसमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. पण तिनं लिहिलेली सुसाईड नोट अत्यंत अस्वस्थ करुन आणि अनेक प्रश्न निर्माण करुन गेली.