www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या २४ तासात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी अनेक रंग दाखविले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला. २४ तासानंतर सायंकाळी ६ वाजता त्यांची कॅबिनेटची पहिली बैठक संपली.
यावेळी मजबूत इच्छा शक्तीमुळे विकासाचे आश्वासनं दिली गेली तर दुसरीकडे मंत्रिमंडळात जास्त भाव न मिळाल्याने काही चेहरे गोंधळलेले होते. तर तुमच्या समोर सादर आहे मोदी सरकारचे २४ तासांतील २४ रंग...
रात्र झाल्यावर नाटक झाले सुरू...
1. मोदींनी सोमवार संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
2. ४५ मंत्र्यांना शपथ दिली
3. रात्रीच मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले.
4. शिवसेना नाराज, अनंत गिते यांनी पदभार सांभाळला नाही.
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक रित्या पदभार स्वीकार केला
पहिल्या निर्णयात मोदींनी दिली आर्थिक मदत
6. आपल्या पहिल्या निर्णयात पंतप्रधानांनी युपीमधील रेल्वे अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली.
7. सार्क देशांच्या प्रतिनिधींशी मोदींनी घेतली भेट
8. काश्मिरात मिग २१ कोसळले, पायलट ठार, संरक्षण मंत्री अरूण जेटलींनी व्यक्त केले दुःख
9. अरुण जेटलींनी महत्वोपूर्ण खाते मिळल्याबद्दल मोदीचे आभार मानले.
10. संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी स्पष्ट केले नव्या लष्करप्रमुखांवर कोणताही वाद नाही.
जेटलीनी वाढविल्या आशा, लवकरच होणार मंत्रीमंडळ विस्तार
11. अरुण जेटली म्हणाले, लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
12. भारत उर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर आर्थिक सत्ता होऊ शकतो – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
13. मीडियावर नियंत्रणाची कोणतीही योजना नाही. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
14. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा सर्वात प्रथम – रेल्वे मंत्री सदानंद गौडा
15. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेणार – आरोग्य मंत्री हर्ष वर्धन
खुलले शरीफ बोलले, मोदींशी मुलाखतीने आनंद झाला
16. हैदराबाद हाऊसमध्ये पाकिस्तातनचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी मोदींची 45 मिनिटे चर्चा
17. दहशतवादासाठी होतोय पाक जमिनीचा वापर, लगेच सुरू करा व्यापार- मोदी बोलले शरीफ यांना
18. अडीच तास मीडियाला पाहावी लागली वाट, शरीफ यांनी मागितली माफी.
19. नवाज शरीफ यांनी मोदींना पाकिस्तातनला बोलावले. परराष्ट्र सचिवांच्या स्तरावर लवकरच चर्चा होणार.
20. शरीफ म्हणाले, भारतात येऊन आनंदी झालो, मोदींना भेटून आनंद.
मोदी म्हणाले, हॅपी बर्थडे गडकरी
21. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन घेतली भेट
22. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्य मंत्रीचा पदभार स्वीकारल्यावर लगेच जितेंद्र सिंग बोलले, कलम ३७० वर आम्ही चर्चेला तयार. .
23. कॅबिनेट बैठक सुरू होण्यापूर्वी मोदी म्हणाले हॅपी बर्थडे गडकरी.
24. साऊथ ब्लॉकमध्ये आज मोदींनी घेतली पहिली कॅबिनेट बैठक.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.