भाजपला ३० लाख मुस्लिमांची साथ

भाजप सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपचा आहे. भाजपा सदस्य म्हणून आतापर्यंत नोंदणी झालेल्या एकूण सदस्यांपैकी ३० लाख सदस्य मुस्लीम असल्याचा दावा देखिल भाजपच्या प्रवक्त्याने केलाय. 

Updated: Jun 4, 2015, 07:23 PM IST
भाजपला ३० लाख मुस्लिमांची साथ title=

नवी दिल्ली  : भाजप सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपचा आहे. भाजपा सदस्य म्हणून आतापर्यंत नोंदणी झालेल्या एकूण सदस्यांपैकी ३० लाख सदस्य मुस्लीम असल्याचा दावा देखिल भाजपच्या प्रवक्त्याने केलाय. 

केवळ 'मिस कॉल' देऊन सदस्य होता येण्याच्या सोयीस्कर पद्धतीमुळे सर्व स्तरावरील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून यामध्ये मुस्लिम बांधव देखील मागे नसल्याचे भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे प्रमुख अब्दुल रशीद अन्सारी यांनी सांगितले. 

भाजपची सत्ता असलेल्या किंवा प्रभाव असलेल्या राज्यांमधून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

मध्य प्रदेशातून ४ लाख, गुजरातमधून २.६ लाख, दिल्लीत २.५ लाख, पश्चिम बंगाल २.३ लाख तर उत्तर प्रदेशातील १.७५ लाख मुस्लिम बांधवांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

भाजपचे सदस्य असलेल्या मुस्लिमांची गणना याआधी केली गेली नव्हती, मात्र यंदा ती दुपटीने वाढली असल्याचा दावाही यावेळी अब्दुल यांनी केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.