७५ वर्षांचा नवरदेव आणि ३५ वर्षांची वधू

प्रेमाला ना वयाचे बंधन असते ना कशाचे. याचेच समर्पक उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळाले. बिहारच्या समस्तीपुरमधील विद्यापती धाम मंदिरात एका ७५ वर्षांच्या प्रेमीने आपल्या ३५ वर्षीय प्रेमिकेशी विवाह केला. 

Updated: Dec 18, 2015, 03:38 PM IST
७५ वर्षांचा नवरदेव आणि ३५ वर्षांची वधू title=

समस्तीपूर : प्रेमाला ना वयाचे बंधन असते ना कशाचे. याचेच समर्पक उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळाले. बिहारच्या समस्तीपुरमधील विद्यापती धाम मंदिरात एका ७५ वर्षांच्या प्रेमीने आपल्या ३५ वर्षीय प्रेमिकेशी विवाह केला. 

जोडा बजारचे निवासी रामचंद्र पासवान यांचे देसरी गावांत राहणाऱ्या मंधाता देवी यांच्याशी प्रेमसंबंध होते. अखेर बुधवारी या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही विवाहबंधनात अडकले. 

विद्यापतीधाम येथे जाऊन त्यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. रामचंद्र यांचे हे चौथे लग्न आहे. तर मंधाता हिचे तिसरे लग्न आहे. दरम्यान, हा विवाह सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलाय.