नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदर यांचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय.
व्हॅटिकन तज्ज्ञ स्टेफ्निया फलास्का यांनी अव्हेनायर या वर्तमानत्रात याबाबत मत मांडलंय. त्यांच्या मते संतपद मिळण्यासाठी किमान दोन चमत्कार व्हॅटिकननं मान्य करावे लागतात. एका ब्राझिलियन व्यक्तीचा ब्रेन ट्युमर बरा केल्याचा चमत्कार व्हॅटिकनच्या एका पॅनलनं तीन दिवसांपूर्वी मान्य केलंय.
पुढल्या वर्षी 4 सप्टेंबरला मदर तेरेसा यांना संतपद देण्याचा सोहळा होण्याची शक्यता या वृत्तपत्रानं वर्तवलीये.