गुवाहाटी: आसाममध्ये पुराचा हाहाकार कायम आहे.. १९ जिल्ह्यांना पूराचा फटका बसलाय. पूरात आतापर्यंत८ जणांचा बळी गेलाय. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.
६ लाख नागरिक या पूरामुळे प्रभावित झालेत. ब्रम्हपूत्र नदीच्या वाढलेल्या पातळीमुळं आसाममध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. मुसळधार पावसामुळं ब्रम्हपुत्र नदीच्या उपनद्याही धोक्याच्या पातळीवर वाहतायत. मदत आणि बचावकार्यासाठी १७७ कॅम्प लावण्यात आलेत.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही पूराचं पाणी शिरलंय. आसामच्या आपत्कालीन व्यवस्था पथकासोबत लष्करालाही मदत आणि बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.