नवी दिल्ली: आता कोणत्याही व्यक्तीला पॅन कार्ड बनविण्यासाठी वोटिंग आयडी किंवा आधार कार्य पुरेसं असणार आहे. आयकर विभागानं प्रक्रिया सोपी करण्यासाठी हा निर्णय घेतला.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) नं नुकतीच एक अधिसूचना काढलीय. ज्यात पॅन कार्ड बनविण्यासाठी जन्म तारखेची निश्चिती करण्यासाठी मतदान ओळख पत्र (इपीआयसी) किंवा आधार कार्ड वैध मानलं जाणार असल्याचं नमूद केलंय. आतापर्यंत या दोन्ही ओळखपत्रांना फक्त पत्ता आणि ओळखीसाठी वैध मानलं जातं. जन्म तारखेसाठी ते ग्राह्य धरले जात नाही.
आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, नव्या अधिसूचनेचा सोपा अर्थ म्हणजे की पॅन कार्ड मिळविण्यासाठी मतदान ओळख पत्र किंवा आधार कार्ड पुरेसं असेल. प्रक्रिया सोपी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.
नव्या अधिसूचनेनुसार सरकारनं कोणत्याही व्यक्तीची जन्मतारखेची सत्यता पडताळणीसाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रम किंवा राज्य सार्वजनिक उपक्रमांच्या या केंद्र सरकार आरोग्य सेवा योजनेचं फोटो कार्डलाही वैध मान्य केलंय.
आता एकूण १२ कागदपत्र पॅनकार्डसाठी जन्म तारखेसाठी देऊ शकता. यापूर्वी ही संख्या ८ होती. सामान्य नागरिक जे सरकारी नोकरीत नसतील त्यांनी केवळ मतदान ओळख पत्र आणि आधार कार्डची गरज असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.