असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

PTI | Updated: Nov 24, 2015, 08:08 PM IST
असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे! title=

नवी दिल्ली : देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!
  
मी देशातील अनेक दंगली पाहिलेल्या आहेत. मात्र, आम्ही देशाकडे पाहिले. आम्हीही राहत आहोत. आम्ही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला नाही. आपल्या देशातील समस्या सोडविण्यासाठी आपण लढले पाहिजे. मात्र, बेताल व्यक्तव्य करु नये, असे ते म्हणालेत.

असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरच्या वक्तव्याशी असहमती दर्शवलीय. भारत मुसलमानांचाही देश असून देश सोडून जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी नमूद केलंय.  त्यांनी आमिरच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.