'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी

'उडता पंजाब' सिनेमावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहेय या वादात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. 

Updated: Jun 9, 2016, 07:42 PM IST
'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी title=

नवी दिल्ली : 'उडता पंजाब' सिनेमावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहेय या वादात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. 

याबाबतीत स्वामी यांनी आप पक्षावर आरोप करताना म्हटलं आहे, पंजाबमधील आगामी निवडणुकीच्या प्रसारासाठी आम आदमी पक्ष खोडकरपणा करतोय.

'उडता पंजाब' हा सिनेमा अयोग्य असल्याचंही स्वामी यांनी म्हटलं आहे. 'उडता पंजाब'मधून पंजाब सरकार अंमली पदार्थांच्या गैरवापराला जबाबदार असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'अंमली पदार्थ ही मोठी समस्या यात काहीही शंका नाही. कोण म्हणते ही समस्या 'अकाली'ने सुरू केली? ती कॉंग्रेससोबत सुरू झाली, असंही स्वामी म्हणाले.

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपचा 'उडता पंजाब' हा खोडकरपणा असल्याचं स्वामींनी म्हटलं आहे.