डॉनला प्रतीक्षा पोर्तुगालला परतण्याची

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमला परतीचे वेध लागलेयत.त्याची पोर्तुगालला जाण्याची धडपड सुरु झालीय

Updated: Jul 15, 2013, 05:33 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमला परतीचे वेध लागलेयत.त्याची पोर्तुगालला जाण्याची धडपड सुरु झालीय.पोर्तुगालमधील त्य़ाचे वकील मुंबईत दाखल झाले असुन सालेमचा प्रत्यार्पण करार रद्द करण्यासाठी ते कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमची पोर्तुगीजला परतण्यासाठी धडपड सुरु झालीय. तुरुंगात दोन वेळा सालेमवर हल्ला करण्यात आलाय. त्यामुळे यावेळी झालेला हल्ल्यामुळे पोर्तुगालमधील सालेमचे वकील मॅनुअर फेरेरा मुंबईत दाखल झाले असुन भारतीय तुरुंगात सालेमच्या जीवाला धोका असल्याचा सालेमच्या वकीलांचा आरोप आहे. त्यामुळे सालेमचं प्रत्यार्पण करार रद्द करण्यासाठी ते रितसर न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
1993 च्या मुंबई बाँब स्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या अबु सालेमवर तुरुंगात दोनवेळा हल्ला करण्यात आलाय.सालेमवर पहिला हल्ला ऑर्थर रोड तुरुंगात झाला होता ज्याची जबाबदारी कुख्यात डॉन दाऊदचा हस्तक मुस्तफा डोसा यानं स्वीकारली होती.मात्र यावेळी सालेमवर झालेला हल्ला हा त्यानं स्वतःच घडवून आणल्याचं बोललं जातेय.कारण असं केल्यानं त्याच्या परतीचा मार्ग मोकळा होणार असल्याचही बोललं जातेय.मात्र सालेमच्या वकीलांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेत.

1993 च्या मुंबई बाँब स्फोट प्रकरणातील आरोपी अबु सालेमला 2002 ला पोर्तुगालमधे अटक करण्यात आलं होती.त्यानंतर त्याला प्रत्यार्पण कराराअंतर्गत भारतात आणलं गेल होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.