नवी दिल्ली : राजधानीत दिल्ली विद्यापीठात आज निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये अभाविपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे. एनएसयूआयच्या चारही उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे.
यावरून दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणूकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एनएसयूआयवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं म्हटलं जातयं
मात्र यावरून तरूणांमध्ये अजूनही मोदींचा प्रभाव कायम असल्याचं मत आता भाजपचे नेते व्यक्त करू लागले आहेत. दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या निवडणुका या दिल्लीच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरतात. कारण या विद्यापीठातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अनेक चळवळीत भाग घेतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.