VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले

गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.

Updated: May 18, 2016, 07:58 PM IST
VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले title=

अहमदाबाद : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.

कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की तरुणी हवेत उडाल्या आणि कारच्या बोनेटवर आदळल्या. कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना सावरायला अवधीच मिळाला नाही. अपघातस्थळी लोक नसल्याने वाहनचालकाने अपघातानंतर गाडी घेऊन पलायन केले.