अभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 23, 2016, 08:00 PM IST
अभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन title=

नवी दिल्ली : अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.

हुमाने एक ट्विटमध्ये म्हटलं आहे की, उमर खालीदला काय बोलायचंय हे देशांने संमजून घ्याव. सोबतच हुमाने उमरच्या भाषणाची एक लिंक देखील खाली ट्विट केली आहे.

जेएनयुचा विद्यार्थी उमर खालीद याच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. ९ फेब्रुवारीला जेएनयु विद्यापीठात अफजल गुरू याच्या समर्थनात घोषणा दिल्या गेल्या होत्या. यामध्ये उमर खालीद हा मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर उमर हा बऱ्याच दिवस गायब होता.

रविवारी रात्री उमर हा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जेएनयुच्या परिसरात दिसला त्यावेळेस ही तो भाषण करतांना दिसला. तो बोलत होता की, माझं नाव उमर खालीद आहे पण मी दहशदवादी नाही.  कोर्टाने उमर सहीत आरोप असणाऱ्या विद्यार्थांना पोलिसांना शरण येण्यास सांगितलं आहे.