१८ वर्षांमध्ये १५ मुली, वडील अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत

 झारखंडच्या गरभदा तालुक्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये एका आदिवासी जोडप्याला आशा होती की, त्यांचं होणारं १६वं बाळ मुलगाच असेल. मात्र २ ऑगस्टला आणखी एका मुलीनं जन्म घेतला. मात्र १५ व्या मुलीच्या जन्मानंतरही त्यांना मुलाच्या जन्माची आशा आहे.

Updated: Aug 11, 2015, 04:27 PM IST
१८ वर्षांमध्ये १५ मुली, वडील अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत title=

गरभदा, झारखंड:  झारखंडच्या गरभदा तालुक्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये एका आदिवासी जोडप्याला आशा होती की, त्यांचं होणारं १६वं बाळ मुलगाच असेल. मात्र २ ऑगस्टला आणखी एका मुलीनं जन्म घेतला. मात्र १५ व्या मुलीच्या जन्मानंतरही त्यांना मुलाच्या जन्माची आशा आहे.

रामसिंह संगोड नावाचा शेतकरी ३३ वर्षीय पत्नी कानूबेन यांच्या लग्नाला २० वर्ष झाले आहेत. वंशाच्या दिवट्याच्या हव्यासापोटी या दाम्पत्यानं १५ मुलींना जन्माला घातलंय. त्यातील दोन मुली दीड-दोन वर्षांच्या असतानाच आजारपणात मृत्यूमूखी पडल्यात. 

त्यात डिसेंबर २०१३ मध्ये या दाम्पत्याला एक मुलगा झालाय. मात्र एका मुलाला एवढ्या मुलींच्या लग्नाचा भार सहन होणार नाही म्हणून त्यांना दुसरा मुलगा हवाय. शिवाय, एकटा मुलगा असेल आणि त्याच्यासोबत एखादा अपघात झाला तर वंश पुढे कोण चालवणार? म्हणूनही त्याला दुसरा मुलगा हवाय.

रामसिंहच्या १५ मुलींपैकी मोठ्या दोघींची लग्न झालीत. आत्ताही कुटुंबात ११ मुली आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे, शाळा तर दूरच पण या मुलींना घरकाम आणि मजदूरीही करावी लागतेय. त्यामुळे, केवळ चार मुलींना शाळेत जाता येतंय.  

२०११च्या जनगणनेनुसार दाहोदमध्ये प्रत्येक १००० मुलांच्या मागे ९४८ मुली आहेत. २००१ मध्ये हा आकडा ९६७ होता. मात्र रामसिंह आणखी एकदा मुलासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे या १६व्या अपत्यानंतर आणखी १७व्यांदा पुन्हा त्यांच्याघरी पाळणा हालू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.