पेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार

देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत. 

Updated: Jan 19, 2015, 03:37 PM IST
पेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार title=

नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत. 

यूपीए सरकारच्या काळात पोषक खतांच्या आधारित सबसिडी सुरू करण्यात आली होती. सबसिडीत युरिया खताचा मोठा वाटा होता. सध्या युरियाची सबसिडीही कंपन्यांना दिली जाते परंतु, नियंत्रणमुक्त झाल्यास ही सबसिडी थेट शेतकऱ्यांना दिली जाईल. त्यामुळं युरियाचे दर वाढले तरी त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार नाही. 

पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे युरिया देखील नियंत्रणमुक्त केल्यास उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा होईल. तसंच शेतकऱ्यांकडून युरियाचा अवाजवी वापर देखील टाळला जाईल अशी सरकारची आशा आहे. सध्या युरियाचे दर ५,३६० रु. प्रतिटन इतके आहेत. युरियाच्या ५० किलो पोत्याची किंमत ही जवळपास २६८ रुपयांपर्यंत जाते. 
युरिया नियंत्रणमुक्त केल्यास सरकारकडून दिली जाणारी सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.