भाजप, काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या! - केजरीवाल

भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या. पण आपली अमूल्य मतं मात्र आम आदमी पक्षालाच(आप) द्या, असं आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

PTI | Updated: Jan 19, 2015, 08:26 AM IST
भाजप, काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या! - केजरीवाल title=

नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या. पण आपली अमूल्य मतं मात्र आम आदमी पक्षालाच(आप) द्या, असं आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

पश्चिम दिल्लीच्या नवादा भागात रविवारी एका रॅलीला संबोधित करताना, केजरीवाल यांनी वरील आवाहन केलं. हा निवडणुकांचा काळ आहे. भाजपा आणि काँग्रेसचे लोक पैसे देत असतील, तर खुश्शाल घ्या, पण मतं मात्र आमच्याच पक्षाला द्या. 

कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही पक्ष जनतेला लुटत आहेत. कुणी २जी घोटाळ्यातून पैसे लाटले तर कुणी कोळसा घोटाळ्यातून पैसे मिळवले. या पक्षाचे लोक तुमच्यापर्यंत आले नसतील तर, तुम्ही स्वत: त्यांच्या कार्यालयात जा. आम्ही तुमची वाट पाहतोय, असं त्यांना सांगा. गेल्या ६५ वर्षांपासून हे पक्ष आम्हाला लुटत आहेत, आता आपली पाळी आहे, असं केजरीवाल यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांच्या या वाक्यासरशी उपस्थित लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

भाषणात केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ताशेरे ओढले. रामलीला मैदानात मोदींच्या भाषणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा अर्धा वेळ मला नक्षली ठरवण्यात आणि माझ्या आंदोलनावर टीका करण्यातच गेला. वैयक्तिक टीकेचं हे राजकारण योग्य नाही. राजकारण हे मुद्द्यांवर आधारित असावं, असं ते म्हणाले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.