नवी दिल्ली : पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. यासाठी एअर इंडियाने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी तीन तास आधीच विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेय.
देशांतर्गत उड्डाणासाठी प्रवाशांना ७५ मिनिटे आधी विमानतळावर रिपोर्टिंग करावे लागते. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांना १५० मिनिटे आधी विमानतळावर उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र आता सर्व प्रवाशांना तीन तास आधीच विमानतळावर यावे लागणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या विमान कंपन्यांनी अद्याप असे आवाहन केलेले नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर प्रवाशांची आणि त्यांच्या सामानांची कसून चौकशी केली जात आहे.