close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तो' आपल्या पाकिस्तानी 'कृष्णा'साठी मिरा बनला!

प्रेमाला जातीची, धर्माची, प्रांताची इतकच काय तर लिंगाचीही सीमा भेदू शकत नाही... लखनऊच्या एका उदाहरणावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 

Updated: Jan 12, 2016, 10:03 AM IST
'तो' आपल्या पाकिस्तानी 'कृष्णा'साठी मिरा बनला!

लखनऊ : प्रेमाला जातीची, धर्माची, प्रांताची इतकच काय तर लिंगाचीही सीमा भेदू शकत नाही... लखनऊच्या एका उदाहरणावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 

लखनऊच्या गौरव नावाच्या एका नर्तकानं 'सेक्स चेंज' (लिंग बदलाची) शस्त्रक्रिया करवून घेतलीय. आपल्या रिझवान या पाकिस्तानी प्रियकरासोबत सहज जीवन जगता यावं यासाठी गौरवनं लिंग बदल करून आता 'मिरा' हे नाव धारण केलंय.  

डॉ. मिथलेश मित्रा यांनी आपल्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचं गौरवनं (आत्ताची मिरा) म्हटलंय. आपण आत्तापर्यंत नॉर्मल लाईफ जगली... मुलींसोबतही आपलं अफेअर होतं. रिझवानशी सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख होण्याच्या वेळेस आपण एका मुलीसोबत लग्नचाही निर्णय घेतला होता, असं मिरा म्हणतेय. 

रिझवान सुफी पंथाशी निगडीत विषयावर पीएचडीचा अभ्यास करत होता, त्याच निमित्तानं गौरव-रिझवानची ऑनलाईन चॅटिंगवर ओळख झाली. या दोघांनी अजून एकमेकांना पाहिलंदेखील नाही. परंतु, आम्ही एकमेकांचाच भाग आहोत असं आम्हाला वाटत असल्याचं मिरा सांगतेय. 

रिझवानच्या आईनं त्याच्यासाठी मुली पाहायची सुरुवात केली तेव्हा आपण हादरून गेलो... त्यानंतर आपण इंटरनेट सर्फिंगवरून आपल्याला लिंगबदलाची कल्पना सुचली आणि आपण ती अंमलात आणली... असं मिरानं म्हटलंय. मार्च महिन्यात रिझवानची आपण पहिल्यांदा भेट घेणार असल्याचंही ती सांगतेय.