एअर इंडिया: ४० वय गाठलं, द्या फिटनेस सर्टीफिकेट

भारतातील सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं चाळीशी गाठलेल्या एअर होस्टेस आणि केबिन क्रू ना मेडिकल फिटनेस टेस्ट देण्याचं फर्मान काढलं आहे.

Updated: Mar 12, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतातील सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं चाळीशी गाठलेल्या एअर होस्टेस आणि केबिन क्रू ना मेडिकल फिटनेस टेस्ट देण्याचं फर्मान काढलं आहे.
विमानात प्रवाशांना सेवा देणाऱ्या कॅबिन क्रू आणि एअर होस्टेसचं वजन वाढल्याचं आणि अनेकांना शाररिक व्याधी जडल्याचं स्पष्ट झालं आहे.
अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचं वजन घटवावं शिवाय त्यांनी फिटनेस सर्टीफिकेट दाखल करावं असं फर्मान काढण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं मात्र याला विरोध केला आहे.