तुरुंगात 'बिस्किटं' भाजणार अजय चौटाला...

हरियाणातील `शिक्षक भरती घोटाला` प्रकरणात दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आमदार अजय चौटाला याला तुरुंगात बिस्किटे बनविण्याच्या बेकरीत काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 26, 2013, 12:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
हरियाणातील `शिक्षक भरती घोटाला` प्रकरणात दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आमदार अजय चौटाला याला तुरुंगात बिस्किटे बनविण्याच्या बेकरीत काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्या ठिकाणी फरसाणही तयार केले जाते. या कामातही त्याला मदत करावी लागणार आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ओमप्रकाश चौटाला आणि अजय चौटाला यांची थेट तुरूंगात रवानगी करण्यात आली.

चौटाला पिता-पुत्रासह ५३ जणांना बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. शिक्षकांची करण्यात आलेली भरती ही कायद्याला धरून नाही. त्यामुळे ती बेकायदा आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.