उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील इलाहाबादमधील मुस्लिम युवक गेल्या अनेक वर्षांपासून रामनामाचा जप करतायत. रामनामाच्या जपामुळे येथील मुस्लिुम आंतरिक समाधाना, शक्ती उर्जा मिळते.
टीओआयच्या एका रिपोर्टनुसार, इलाहाबाद स्थित मुस्लिम युवकांचा समूह एका वेगळ्या पद्धतीने नवी परंपरा जोपासतोय. हे लोक रामाचे नाव लिहून राम नाम बँकेत जमा करतात. माघ मेळ्यादरम्यान हे रामाचे नाव लिहितात आणि जमा करतात.
दहा वर्षांपूर्वी मी याबाबत एका वर्तमानपत्रात वाचले होते. तेव्हापासून मी रामनाम लिहित आहे. याद्वारे मला आंतरिक समाधान, उर्जा, शक्ती मिळते, असे मुस्लिम युवक फैजल खानने सांगितले. याशिवाय या समूहातील अन्य मुसलमान रमजान महिन्यात नमाजही पढतात. तसेच त्यांना भगवदगीताचे श्लोक आणि मंत्रही माहीत आहेत.
फैजल खान गेल्या आठ वर्षांपासून राम नाम हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत लिहित आहे. या शहरात असेही मुस्लिम आहेत जे रामनवमी दरम्यान व्रतही ठेवतात.