www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
एकीकडे जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा एकदा आपल्या प्राणांची बाजी लावली असताना, केजरीवाल आणि कंपनी मात्र विजयाच्या उन्मादात मश्गूल झालीय. राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंनी एकाकी झुंज सुरूच ठेवलीय, तर अण्णांचा वापर करून निवडणुकीत मोठं झालेल्या केजरीवालांना आता आपल्या गुरूचा चक्क विसर पडलाय. दिल्लीमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या केजरीवालांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आता साधा पाठिंबाही जाहीर केलेला नाही.
आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतील विजयानंतर केजरीवालांनी अण्णांना साधा फोनही केलेला नाही. `गरज सरो आणि वैद्य मरो`, या म्हणीची आठवण यावी, असाच हा केजरीवाल आणि कंपनीचा प्रताप आहे. अण्णांना धक्क्याला लावणारे केजरीवाल उद्या आम जनतेला धक्क्याला लावणार नाहीत कशावरून..? असाही सवालही त्यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.