close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर अॅसिड हल्ला

उत्तर पश्चिम दिल्लीच्या केशवपुरम भागात एका ३० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. 

Updated: Jan 10, 2015, 01:08 PM IST
दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर अॅसिड हल्ला

नवी दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीच्या केशवपुरम भागात एका ३० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. 

शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडलीय. या घटनेत पीडित महिला गंभीर  जखमी झालीय.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅसिड हल्ल्यानंतर जवळपास उपस्थित असलेल्या लोकांनी पीडित महिलेला तातडीन हॉस्पीटलमध्ये दाखल केलं.  

या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. त्याचं नाव मनजीत असल्याचं सांगण्यात येतंय... मनजीत पीडित महिलेचा घरमालक आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय... पण, पोलीस अजून मनजीतच्या साथीदाराच्या शोधात आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.