www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.
आता केजरीवाल सर्वांच्या तक्रारी ऑनलाइन पाहणार आहे. तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबरी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री आठवड्यातून एक दिवस तीन तासांसाठी नागरिकांना भेट देणार आहे. पण यावेळी ते तक्रारी ऐकणार नाही. त्यांनी आज भ्रष्टाचारासाठी प्रत्येक खात्याच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर आणि कॉल सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली.
ऑनलाइन तक्रारींच्या बाबतीत केजरीवाल म्हणाले, की नागरिक वेबसाइट आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून तक्रार दाखल करू शकतात. तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवी सिस्टीम तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन किंवा पत्र पाठवून नागरिक आपल्या तक्रारी दाखल करू शकतात. तसेच कॉल सेंटरच्या माध्यमातूनही तक्रारी दाखल करता येणार आहे. तक्रारींचे निवारण ३ दिवसांच्या आत करण्यात येईल असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.