'जयललितांना बाधली काळी जादू'

चेन्नईच्या एका मोठ्या अध्यात्मिक गुरुच्या म्हणण्याप्रमाणे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काळी जादू बाधलीय. 

Updated: Oct 27, 2016, 08:45 PM IST
'जयललितांना बाधली काळी जादू' title=

चेन्नई : चेन्नईच्या एका मोठ्या अध्यात्मिक गुरुच्या म्हणण्याप्रमाणे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काळी जादू बाधलीय. 

जयललिता या सप्टेंबर महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये भरती आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आपली ओळक लपवत अध्यात्मिक गुरुंनी जयललिता या काळ्या जादूच्या शिकार ठरल्याचं म्हटलंय. जयललिता यांचे अनेक शत्रू सध्या कार्यरत आहेत. जयललिता यांच्याविरुद्ध केवळ विरोधी पक्षाचेच (डीएमके) लोक नाहीत तर त्यांच्याच पक्षातील (एआयएडीएमके) लोकही कट रचत असल्याचं या गुरुंचं म्हणणं आहे.

चेन्नईच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये भरती जयललिता यांच्या स्वास्थ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येतेय. नवी दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलच्या चिकित्सकांशिवाय लंडनचे विशेषज्ज्ञ त्यांच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत.