बंगळुरू : बंगळुरू शहरात एक असा प्रकार समोर आला तो ऐकून तुम्हांलाही हैराण व्हायला होईल. बंगळुरू एक ऑटो चालक आपल्या रिक्षात फक्त महिलांना बसवायचा.
ऑटोमध्ये एक मोबाईल लपविलेला होता त्यातून तो महिलांचे व्हिडिओ बनवत होता. पोलिसांनी या रिक्षाची तपासणी केल्यावर त्यात छुपा कॅमेरा सापडला. पोलिस या प्रकरणी त्याच्या फेसबूक पोस्टचीही माहिती घेत आहे.
एका महिलेने फेसबूकवर पोस्ट केले की २४ जुलै रोजी कथित रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बसली, त्यावेळी खड्यातून वाचण्यासाठी रिक्षाचालकाने रिक्षा वळवली तर महिलेच्या पायात छतावरून मोबाईल पडला. महिलेने फोन पाहिला तर मोबाईल व्हिडिओ मोडवर ऑन होता. तसेच फ्लॅश लाइटही ऑन होती.
मोबाईल असा लावला होता की महिलेच्या शरिराचा वरील भाग रेकॉर्ड केला जाईल. महिलेने फोन उचलल्यावर ड्रायव्हरच्या लक्षात आले. तो गोंधळला आणि महिलेचा अवतार पाहून त्याने माफी मागितली.
महिलेने रिक्षा थांबवून आपल्या मित्राला फोन करण्यास सुरूवात केली. रिक्षा चालकाने फोन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी काही लोक जमा झाले. लोकांनी गोंधळ केला. परिस्थिती पाहून महिला आणि तिच्या मित्राने रिक्षा चालकाला सोडले. पण सोडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कुश्चित हास्य होते आणि त्याला या प्रकाराचा पश्चातापही नव्हता.