VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!

गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून आता दोन मुस्लीम महिलांना गुंडाकडून मारहाण करण्यात आलीय. 

Updated: Jul 28, 2016, 12:59 PM IST
VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण! title=

भोपाळ : गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून आता दोन मुस्लीम महिलांना गुंडाकडून मारहाण करण्यात आलीय. 

मध्यप्रदेशच्या मंदसौर रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. एका संघटनेच्या टोळक्याकडून दोन महिलांना माराहण करण्यात आली. 

व्हिडिओ व्हायरल

उल्लेखनीय म्हणजे, ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली... आणि थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. 

बघ्यांची मूक संमती?

धक्कादायक म्हणजे यावेळी ही घटना पाहणाऱ्यांपैंकी कुणीही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही... त्यामुळे ही एक प्रकारची मूक संमती होती का? असाही प्रश्न विचारण्यात येतोय. 

...पण ते गोमांस नव्हतंच

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांकडे ३० किलो मांस मिळालं होतं. परंतु, ते गायीचं मांस नसून म्हशीचं होतं. वेटेनरी डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात ही गोष्ट स्पष्ट झालीय. 

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/VANyUeOl0mI?rel=0" frameborder="0" allowfullscreen></iframe>