बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर

परदेशी कंपनीला टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली आटा नूडल्स उत्पादनं बाजारात आणलाय. आटा नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा त्यांनी दिल्लीत मोठा कार्यक्रम घेऊन केलीय. 

Updated: Nov 16, 2015, 08:58 PM IST
बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर  title=

नवी दिल्ली : परदेशी कंपनीला टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली आटा नूडल्स उत्पादनं बाजारात आणलाय. आटा नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा त्यांनी दिल्लीत मोठा कार्यक्रम घेऊन केलीय. 

परदेशी कंपनीच्या तूलनेत पंतजलीचं नूडल उत्पादन उत्तम असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी केलाय. न्यूडल्स आटा दुर्मीळ औषधांपासून तयार केला असून शरीरासाठी फायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

नूडल्स आटाचं ७० ग्रॅमचं एक पॅकेट १५ रुपयांत मिळणार असून त्यातून मिळणाऱ्या पैसा आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे. देशातील पैसा देशातच राहावा यासाठी स्वदेशी मालाचं अधिक उत्पादन करणार असल्याचही बाबा म्हणालेत. 'झटपट बनवा आणइ निश्चिंत होऊन खा' ही पतंजली आटा नुडल्सची टॅगलाईन असणार आहे. 

आपल्या उत्पादनांची मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या वर्षभरात 'पतंजली' पाच नवे मॅन्युफॅक्टरिंग युनिटस् स्थापित करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश इथं या युनिटसची स्थापना होण्याची शक्यता आहे. यामध्ये पतंजलीच्या इतर उत्पादनांचीही निर्मिती होईल. 
    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.