नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून त्याबद्दल कळवलंय.
ते म्हणाले, की सन्याशानं सन्मान वा पुरस्कार स्वीकारणं उचित नाही. रविशंकर यांनीही हा पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली.
सरकार माझ्या नावाचा पद्म पुरस्कारासाठी विचार करत असल्याचं समजलं, तसं पाहता या पुरस्कारासाठी आणखी बरेच लायक लोक आहेत. माझ्याऐवजी इतरांचा गौरव झालेला पाहताना मला आवडेल, असं रविशंकर यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना सांगितलं. आज रविशंकर यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.