नवी दिल्ली : राजस्थानच्या बाडमेर येथे आकाशात एक संशयित बलून दिसला. त्यानंतर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरा बलून दिसल्याने हल्ल्याची भिती नाहीना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.
आकाशात संध्याकाळी पाच वाजता संशयित फूगा आढळून आला. बलून दिसल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. दिल्लीत तात्काळ अॅलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी हवाई दल आणि हवाई नियंत्रण कक्षाला लगेच अलर्ट जारी केलेत.
दिल्लीत सकाळी १०.३० वाजता असाच बलून दिसला. त्याआधी मंगळवारी, संशयित बलून बारमेर येथे दिसून आला. संरक्षण मंत्रालयाने या घटनेनंतर सुरक्षितेचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
हा बलून पाकिस्तानकडून सोडण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा बलून भारतीय वायू सेनेने पाडला. पाकिस्तांकडून गुंगारा देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आमची सुरक्षा मजबुत आहे. त्यामुळे त्यांना काहीही मिळणार नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलेय.