बंगळुरू: इथल्या एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारावरून वातावरण तापलेलं असतानाच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे.
विबग्योर हायस्कूलमध्ये २ जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. पण १५ जुलैला हे प्रकरण उघडकीस आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली. मुस्तफा असं या आरोपीचं नाव असून त्याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रं आणि अश्लिल विद्यार्थिनींचे व्हिडिओ आढळून आले होते.
या घटनेमुळं कर्नाटकसह देशभरातील वातावरण ढवळून निघालं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.