बॅंकाच्या सुट्ट्या संपल्या, ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका

 सलग नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर बॅंकाचं कामकाज आज सुरळीत सुरू झालंय. पण या सुट्ट्यांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 

Updated: Apr 6, 2015, 01:03 PM IST
बॅंकाच्या सुट्ट्या संपल्या,  ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका title=

मुंबई :  सलग नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर बॅंकाचं कामकाज आज सुरळीत सुरू झालंय. पण या सुट्ट्यांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 

गेल्या नऊ दिवसांपैकी फक्त अडीच दिवस बॅंकाचं कामकाज सुरळीत पार पडलं होतं. बाकीचे दिवस बॅंकाना सुट्ट्याच होत्या. त्यामुळं नोकरवर्गाचे पगार जमा होऊ शकले नव्हते. याकारणानं ग्राहकांचे कर्जांचे हप्ते क्लिअर होऊ शकले नव्हते. त्यामुळे विनाकारण ग्राहकांना दंड भरावा लागणार आहे. 

तसंच ग्राहकांचे प्रलंबित व्यवहारांची पूर्ती करण्यासाठी बॅंकामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेक भरणे, रोकड काढणे, भरणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर सोमवारी होतील त्यामुळे बँकांत गर्दी दिसून येणार आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.