गुडन्यूज : बॅंक लोन घ्यायचे असेल तर थोडे थांबा !

जर तुम्ही बॅंक लोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण येणाऱ्या काही काळात बॅंका आपल्या व्याजदरात कपात करु शकतात, अशी माहिती आहे. वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये बॅंकांची क्रेडिट ग्रोथ गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी क्रेडिट ग्रोथ असल्याकारणाने बॅंका आपला व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत.

Updated: Apr 4, 2015, 06:08 PM IST
गुडन्यूज : बॅंक लोन घ्यायचे असेल तर थोडे थांबा ! title=

नवी दिल्ली : जर तुम्ही बॅंक लोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण येणाऱ्या काही काळात बॅंका आपल्या व्याजदरात कपात करु शकतात, अशी माहिती आहे. वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये बॅंकांची क्रेडिट ग्रोथ गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी क्रेडिट ग्रोथ असल्याकारणाने बॅंका आपला व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत.

शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वित्तीय वर्ष २०१४-१५मध्ये मार्चपर्यंत क्रेडिट ९.२ टक्के दराने वाढला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून ७ एप्रिलला येणाऱ्या मॉनिटरी पॉलिसीची वाट बॅंका पाहत आहेत. या पॉलिसीमध्ये रिझर्व बॅंक व्याजदराबाबत विशेषसूचना देण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या वित्तीय वर्षातही क्रेडिट ग्रोथ १० टक्क्यांपेक्षाही कमी राहिल्यास बॅंका होम लोन आणि ऑटो लोन यांसारख्या लोनवर व्याजदर कमी करु शकतात.

बॅंकाचा क्रेडिट ग्रोथ जरी कमी असला तरी, बॅंकाकडे पुरेसे पैसे उपलब्ध आहेत. ज्याचा वापर बॅंका लोन देण्यासाठी करू शकतात.  स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय.  बॅंक, अॅक्सिस बॅंक यांसारख्या बॅंका क्रेडिट ग्रोथ वाढवण्यासाठी व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.