नवी दिल्ली : बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, बराक ओबामा यांना मागील दौऱ्याची दिवाळीही आठवली, आणि या दौऱ्यात आपल्याला नाचता आलं नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ओबामांनी मागील दौऱ्याचा संदर्भ देतांना सांगितलं, 'मागील दौऱ्याला आम्ही आलो होतो, तेव्हा आम्ही दिवाळी साजरी केली, डान्सही केला, पण यावेळी हे शक्य झालं नाही', 'मात्र मागच्या वर्षी आम्ही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती'.
'मार्टिन लूथर किंग आणि महात्मा गांधी हे माझे आदर्श आहेत, आणि हेच कारण आहे की भारत आणि अमेरिका आज सोबत असावेत', असं ओबामांनी सांगितलं.
ओबामा पुढे म्हणाले, 'आणखी एक संबंध आहे, जो भारत-अमेरिकेला जोडून ठेवतो, अमेरिकेने भारताच्या एका व्यक्तीचा सन्मान केला होता, ते होते विवेकानंद, ज्यांनी अमेरिकेत हिंदू धर्माचा प्रचार केला आणि त्यांनी हेच म्हटलं होतं, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आणि मी आज पुन्हा हेच म्हणतोय, माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो'.
ओबामा म्हणाले, 'भारत आणि अमेरिका ज्ञान आणि संशोधनाला वाव देत आहेत. दोन्ही देशांनी अंतराळ क्षेत्रात मोठं काम केलं आहे. आपण अशा निवडक देशांमध्ये आहोत, जे चंद्रावर जाऊन आले आहेत आणि ज्यांना अंतराळात मोठं यश लाभलंय'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.