रेल्वे तिकिटांना बारकोड

टीसीं खाबूगिरीला चाप लावण्यासाठी रेल्वेने नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या तिकिटांवर बारकोड टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कंपन्या इच्छूक असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आलेय.

Updated: Sep 9, 2014, 12:13 PM IST
रेल्वे तिकिटांना बारकोड title=

नवी दिल्ली : टीसीं खाबूगिरीला चाप लावण्यासाठी रेल्वेने नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या तिकिटांवर बारकोड टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कंपन्या इच्छूक असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आलेय.

रेल्वे तिकीट तपासनीस यांना तिकीट आणि ओळखपत्र दाखवावे लागणार नाही. कारण रेल्वे तिकिटांना बारकोड लावला जाणार आहे. बारकोड तिकिटांची तपासणी थेट मशीनच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे दंड वसूल करताना काही टीसी मधल्यामध्ये पावती न  फाडण्याला लगान बसून अनागोंदी वृत्तीला आळा बसेल, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

बारकोडसाठी तिकीट योजनेसाठी अनेक कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे. आम्ही बारकोडचा विचार केलाय, असे रेल्वे बोर्ड प्रवक्ते अनिलकुमार यांनी सांगितले. 

तिकीट तपशील मशीनच्या माध्यमातून सेंट्रल सर्व्हरला पाठविला जाणार आहे. तिकिटांमध्ये काही गैरव्यवहार आढळला वा दंड वसून करावयाचा असल्यास त्याची नोंदही सेंट्रल सर्व्हरवर होईल.  
दरम्यान, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी बारकोड असलेले मशीन रेल्वे स्थानकावर आत आणि बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळ बसविली जाणार आहे. तेथून बारकोडयुक्त तिकीट असणारी व्यक्तीच पलीकडे जाऊ शकते. ही योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर २५ स्थानकात लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने त्याचा उपयोग करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.