तुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा!

तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...

Updated: Sep 10, 2015, 05:38 PM IST
तुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा! title=

नवी दिल्ली : तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...

होय, ही संधी तुम्हाला सोशल नेटवर्किंग साईट यूट्यूबनं दिलीय. यासाठी यूट्यूबनं एक खास पार्टनरशिप प्रोग्रामही तयार केलाय. या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन तुम्हीही तुमचे व्हिडिओ शेअर करून पैसे कमवू शकता.

यासाठी केवळ एक अट आहे आणि ती म्हणजे तुमचे व्हिडिओ ओरिजनल असायला हवेत. 

या प्रोग्रामला जॉईन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत. तर केवळ यूट्यूब पार्टनरशिप फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करावे लागतील. 

या व्हिडिओची लिंक तुम्ही ट्विटर, फेसबुक आणि इतर माध्यमांतून तुमच्या मित्रांना पाठवू शकता. या व्हिडिओजवर तुम्हाला जितके क्लिक मिळतील त्याप्रमाणात यूट्यूब तुम्हाला याचे पैसे देईल. 

अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं टॅलंट तर लोकांसमोर आणूच शकता... तुमची निर्मितीक्षमता सिद्ध करू शकता... आणि चांगली कमाईही करू शकता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.