व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. 

Updated: Sep 4, 2015, 05:37 PM IST
व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी title=

लखनऊ :  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. 

आग्रातील शमशाबाद भागात राहणाऱ्या एका युवकाने व्हॉट्सअॅपवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली. त्यानंतर संतापलेल्या समाजातील लोकांनी त्या युवकाला जबरदस्त मारहाण केली. विशिष्ट समाजातील लोक इतके संतापले की त्यांनी आपल्या जवळ असलेल्या रुमालांनी युवकाचा गळ्याभोवती फास तयार केला आणि चौकात त्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी तरूणाचे कुटुंबिय आल्यानंतर त्याला वाचवण्यात आले. पण अजूनही परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे शहरात अशांतता पसरली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.