www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहारच्या पटनासाहिब गुरुद्वारात दोन गटांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती हातबाहेर गेली नाही.
शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंग यांच्या ३४७ व्या प्रकाश उत्सवानिमित्त येथील गुरद्वारामध्ये शिख समुदायाचे हजारो भक्त आले होते. मात्र नव्या ग्रंथीच्या नियुक्तीचा वाद मंगळवारी सकाळी चांगलाच पेटला आणि गुरुद्वारमधील उत्सवाचं वातावरण बदलूनच गेलं.
नियुक्तीवरून शिखांच्या दोन गटात हाणामारी सुरु झाली, गुरुद्वारातच दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. त्यामुळं संपुर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ