बिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय. 

Updated: Nov 5, 2015, 06:03 PM IST
बिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल title=

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय. 

तर दुसरीकडे बिहार निवडणूक ही अत्यंत खडतर निवडणूक होती. आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकू, असा विश्वास भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी व्यक्त केलाय. मात्र, निवडणुकीचा कौल हा एक्झिट पोलने भाजपच्या बाजुने दिलाय.

इंडिया टीव्ही-सी व्होटर 
इंडिया टीव्ही-सी व्होटर यांच्या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भाजपाप्रणित रालोआ सरकारला १०१ ते १२१ जागा तर महाआघाडीला ११२-१३२ जागा मिळू शकतील. तर इतर पक्षांना ६ ते १४ जागा मिळतील.

इंडिया टुडे-आयटीजी 
इंडिया टुडे-आयटीजी सिसेरोच्या एक्झिट पोलनुसार भाजपाप्रणित रालोआला १२० जागा तर महागठबंधनला ११७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर इतर पक्षांना ६ मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाइम्स नाऊ - सी व्होटर
टाइम्स नाऊ - सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार महागठबंधनला ४२ टक्के मतं आणि १२२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपाप्रणीत रालोआला ४१ टक्के मतं १११ जागा मिळतील असा अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.